संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय
थोडक्यात
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू
अदानीसंदर्भातील मुद्दा सभागृहात मांडला जाण्याची शक्यता
रविवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात 16 विधेयके मांडली जाणार आहेत. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन अनेक मुद्यांवर गाजण्याची शक्यता आहे.
यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, मंत्री अनुप्रिया पटेल, काँग्रेस नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, खा. हरसिमरत कौर बादल हे उपस्थित होते.
या अधिवेशनामध्ये अदानी प्रकरण गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून विरोधी पक्षाने याच मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चेची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.