कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार

कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. दुसरीकडे शिंदे गटानं मात्र एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आधी बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्याला पाणी देऊ. नंतर म्हणाले, अक्कलकोट, पंढरपूरमधील गावांना कर्नाटकात यायचे आहे. आणि आता थेट मंत्र्यांनाचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली- कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टिमेटम आज संपणार आहे. रविवारी संध्याकाळी जतच्या उमदी या ठिकाणी पाणी संघर्ष कृती समितीची व्यापक बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा देण्यात आला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ही बोंबाबोंब कधी थांबणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार याला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com