राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज वडीगोद्री मध्ये येणार असून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज वडीगोद्री मध्ये येणार असून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आमरण उपोषण करत आहेत.

त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीत भेट देणार आहेत. शिष्टमंडळाकडून उपोषण सोडण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अतुल सावे,संदीपान भूमरे आणि भागवत कराड यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com