कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन नागरीक जखमी

कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन नागरीक जखमी

कळव्यात ओमकृष्ण सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कळव्यात ओमकृष्ण सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. स्लॅब कोसळल्यानं तीन नागरीक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडला.

रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं आहे. सोसायटीमध्ये 90 ते 100 व्यक्ती राहत होते. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com