ताज्या बातम्या
मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सायन पूल 2026पर्यंत राहणार बंद
मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सायन पूल बंद राहणार आहे.
मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सायन पूल बंद राहणार आहे. सायन पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील पुलाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर 1 ऑगस्ट 2024 ते 31जुलै जुलै 2026 असे दोन वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. मार्ग आणि पुलावरून, तर पूर्व संत रोहिदास मार्गाने पुला वाहिनीवरून बी. ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक तसेच बी. ए. रोडवरून सायन पुलावरून पश्चिम वाहिनीमार्गे एल. बी. एस. मार्ग, संत रोहिदास मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.