वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला
अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद करण्यात आला होता. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत उपोषण सुरु आहे. यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी त्यांचं उपोषण सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचेसुद्धा उपोषण सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद करण्यात आला होता. वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी फाट्यावर पोलिसांकडून बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
मात्र आता वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला असून कार्यकर्त्यांना आंदोलकांना भेटता यावं म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.