राज्यात आज 1 हजार 165 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागणार
राज्यात आज 1 हजार 165 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान झाले. तर विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार काल सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी काल मतदान झाले.
काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान पूर्ण केले गेले. राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
काल रविवारी सरासरी 64.83 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थेट सरपंच कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.