हरवलेले दागिने पोलिसांनी मिळवुन दिले आणि महिलेला रडू कोसळले

हरवलेले दागिने पोलिसांनी मिळवुन दिले आणि महिलेला रडू कोसळले

भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात राहणारे रविंदार सिंग यांची पत्नी आपल्या मूळगावी पंजाबला जाण्यासाठी निघाले.आणि रिक्षात स्वतःच्या दागिनेची बॅग विसरले.....
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मीरा भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात राहणारे रविंदार सिंग यांची पत्नी आपल्या मूळगावी पंजाबला जाण्यासाठी निघाले.आणि रिक्षात स्वतःच्या दागिनेची बॅग विसरले त्यानंतर शोधा शोध केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.नया नगर पोलिसांनी चार दिवसात दागिने परत केले त्यावेळी महिला ढसा ढसा रडली.

भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात रविंदर सिंग हे कुटूंब राहत आहे.कौटुंबिक कार्यक्रमासाठी रविंदर यांची पत्नी आणि मुलगा गावी पंजाबला जाण्यासाठी 26 एप्रिलला निघाले.रामदेव पार्क परिसरातून रिक्षा पकडून मिरारोड स्टेशनला उतरले त्यावेळी सर्व साहित्य रिक्षातून खाली केल्यानंतर रवींद्र यांची पत्नी एक कापडी पिशवी दागिनेने भरलेली विसरून गेली.मिरारोड स्थानकावर पोहोचल्यानंतर रवींदर यांच्या पत्नीच्या लक्षात आले असता त्यांनी काही काळ स्टेशन परिसरात रिक्षा चालकाचा शोध घेतला.मात्र पंजाबला जाण्यासाठी गाडी सुटू नये म्हणून रविंदर सिंग यांनी आपल्या पत्नीला बोरीवली स्थानकातून पंजाबसाठी रवाना केले.

त्यानंतर मिरा रोड परिसरातील अनेक रिक्षा चालकांशी संपर्क करून शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांच्या हाताला काही लागले नाही रविंदर यांनी स्थानिक नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या अनुषंगाने नया नगर पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या परिसरातले सीसीटीव्ही तपासून संबंधित रिक्षा चालकाचा शोध लावला आणि दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.दागिने परत देण्यासाठी रवींदर यांना नयानगर पोलिसांनी संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलवले असता आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर संपर्क साधून सदरचे दागिने दाखवले असता रविंदर यांची पत्नी रडू कोसळले. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचे आभार मानले.सदरचे दागिने तक्रारदार रविंदर सिंह यांना परत देण्यात आले.पंजाब वरून मिरारोडला आल्यास पोलिसांचे आभार भेट घेणार असल्याचं महिलेने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com