फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर मुंबईत; 276 प्रवासी सुखरुप मायदेशी परतले
मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान अखेर मुंबईत दाखल झालं आहे. या विमानात 303 प्रवासी होते. त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात सुखरूप परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून दोन प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत.
भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. 22 डिसेंबरला मुंबईकडे येणारे विमान पॅरिसजवळील विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या विमानात 303 प्रवासी होते, त्यात बहुतांश प्रवासी भारतीय होते.
हे विमान अखेर आता 276 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. विमानाने फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावरून 25 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता उड्डाण केलं आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता हे विमान मुंबईत उतरलं. मानवी तस्करीच्या संशयावरून 4 दिवस प्रवासी त्या ठिकाणी अडकले होते.