तिसरीपासून परीक्षा होणार सुरू : दीपक केसरकर
राज्यात आठवीपर्यंत परिक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार असल्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे. ते आज माध्यामांशी बोलताना दिले आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, सध्या आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा इयत्ता तिसरीपासून पुन्हा परिक्षा सुरू करण्याबाबत राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुत्तीर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे.
यासोबतच, शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच ओझ होणार कमी होणार असल्याची घोषणाही केसरकरांनी केली आहे. शालेय विभागाकडून पुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा विचार सुरु आहे. अभ्यास करताना विद्यार्थ्यांना वही शोधण्यासाठी वेळ लागू नये, यासाठी राज्य सरकार आणि शालेय विभाग मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, एका पुस्तकाचे तीन भाग होणार आहेत. पहिल्या तीन महिन्यात जे शिकवलं जाणार तेच पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेत नेता येईल. यामुळे पुस्तकांचं ओझं कमी होणार आहे. शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. या विषयी दीपक केसरकर यांची तज्ज्ञांसोबत बैठक सुरू असल्याचेही म्हंटले आहे.