पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Admin

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. दगडूशेठ गणपती निघाला. पुण्यातील बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. दगडूशेठ गणपती निघाला. पुण्यातील बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु होण्यास दुसरा दिवस उजाडला असून दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोशनी केलेल्या रथातून मार्गस्थ झाला.

दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आलेले श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघाली. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ आहे. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा सनई चौघड्याचा गाडा, गंधर्व बॅंड तसेच शिवगर्जना वाद्य पथकसह ढोल ताशा पथक सहभागी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com