Deepak Kesarkar
Deepak KesarkarTeam Lokshahi

वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही- दीपक केसरकर

मागील काही दिवसांपासून राज्यातील शाळा बंद होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या बंद होणाऱ्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असल्याची चर्चा आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

सतेज औंधकर, कोल्हापूर

मागील काही दिवसांपासून राज्यातील शाळा बंद होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या बंद होणाऱ्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा असल्याची चर्चा आहे. या चर्चांमुळे काही घटकांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. जर शाळा बंद झाल्या तर, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं तर शिक्षकांच्या नोकरीवरही गदा येऊ शकते अश्या चर्चा राज्यभर सुरू होत्या. आता या विषयावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Deepak Kesarkar
फ्लॅट विकणे, भाड्याने देण्यासाठी आता सोसायटीच्या एनओसीची गरज नाही

काय म्हणाले दीपक केसरकर:

"वीस पटाच्या आतल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. या केवळ अफवा असून अफवा पसरवणाऱ्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावरती प्रसंगी कारवाई करू" असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. "या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातील अशीही अफवा पसरली जात आहे.मात्र शिक्षकांना सर्विस ऍक्ट नुसार प्रोटेक्शन असते त्यामुळे अशी कोणतेही घटना घडणार नसल्याचं" त्यांनी नमूद केलं.

नेमक्या काय चर्चा सुरू होत्या?

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याची चर्चा सुरू होती. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुलं शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी अशी मागणी सर्वच स्तरांतून होत होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com