घरातल्या गीझरने घेतला प्रेमी युगुलाचा जीव; नेमकं काय घडलं?

घरातल्या गीझरने घेतला प्रेमी युगुलाचा जीव; नेमकं काय घडलं?

बेंगळुरूमधील चिक्काजाला येथे एक विवाहित जोडप्याचा घरातील गीझरमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बेंगळुरूमधील चिक्काजाला येथे एक विवाहित जोडप्याचा घरातील गीझरमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर एम (30) आणि त्यांची पत्नी सुधराणी (22) हे 10 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तारबनहल्ली येथील त्यांच्या घरी आले. रात्री 9.10 च्या सुमारास हे दाम्पत्य गॅस गिझर चालू करून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. बाथरुमचे दार आणि खिडकी बंद होती. दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

घर मालकाने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी दरवाजा तोडला, त्यावेळी बाथरुममध्ये हे जोडपं मृतावस्थेत आढळून आलं. हा मृत्यू गॅस गिझरच्या कार्बन मोनॉक्साईडमुळे झाला असावा असा अंदाज आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com