Kearala: केरळच्या वायनाडमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 160 च्या जवळपास

Kearala: केरळच्या वायनाडमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 160 च्या जवळपास

केरळच्या वायनाडमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 148 वर पोहोचला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

केरळच्या वायनाडमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 158 वर पोहोचला आहे. तसंच, 90 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत बचावकार्य थांबवावं लागलं होतं. आतापर्यंत मेपड्डीमध्ये 90 आणि निलांबूरमध्ये 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. निलांबूरमध्ये शरीराचे बरेच भाग सापडले आहेत. काही भाग मेपाडी मध्ये सापडले आहेत, असं केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितलं.

विविध रुग्णालयात 192 लोकांना दाखल करण्यात आलं आहे. बेपत्ता लोकांचा आकडा 98 वर गेला आहे. बचावकार्य करणाऱ्या लोकांना प्रचंड प्रभावित झालेल्या भागात जाताच आलेलं नाही हे यामागचं मुख्य कारण आहे. मेपाडी येथील 150 मुलांना 4 छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. 600 वयस्कर लोकही तिथे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगता येणं शक्य नाही. दुर्घटनाग्रस्त भागात चहाचे मळे असून दरड कोसळल्याने त्या भागात हेलिकॉप्टरही उतरण्यास अडचणी येत आहेत. दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Kearala: केरळच्या वायनाडमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 160 च्या जवळपास
उरण हत्याकांड प्रकरणातील दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com