मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'ची दखल,सरकारचं शिष्टमंडळ आंदोलकांच्या भेटीला
किसान सभेच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी लाँग मार्च बुधवारी (दि.२६) दुपारी हा मोर्चा काढण्यात आला आहे. अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदतीचा एक रुपया देखील मिळाला नसल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले. सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.
महसूल मंत्री व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.राज्य सरकारच्या प्रतिनिधींची आज शेतकरी नेत्यांसोबत बैठक होणार आहे.सरकारच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा होणार आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास लाँग मार्च स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीसाठी सरकारकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आज गुरुवारी (दि.२७) आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत.