HSC & SSC Exam: बोर्डाकडून 2025च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

HSC & SSC Exam: बोर्डाकडून 2025च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडाळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडाळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत.

12 वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. तसेच मे आणि जून महिन्यात या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. मंडळानं दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्ट पर्यंत कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com