Thane School Update
Thane Rain UpdateLokshahi

Thane Rain Update: शुक्रवारी ठाण्यातील शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांची माहिती

मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यानं एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस पडला.
Published by :
Naresh Shende
Published on

Thane Muncipal Corporation: मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यानं एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शासनाकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपात्कालीन कक्षाला भेट देत दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळं महापालिका हद्दीतील सर्व शाळांना उद्या २६ जुलैला शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

शुक्रवारी देखील मोठी भरती असून रेड ॲलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती आयुक्त राव यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात २० पेक्षा जास्त फोनची सुविधा २४ तास कार्यान्वित आहे. फोनवर आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होईपर्यंत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असंही आयुक्त सौरभ राव म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com