मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटात मोठ्या हालचाली
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचाली घडताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. भाजपकडून तर थेट मंत्रीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ठाकरे गटाकडूनही आता राज्यसभेतील खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यासाठी चाचपणी सुरु झाल्याची बातमी आली आहे.
भाजपकडून लोकसभेच्या खासदारांसाठी चाचपणी सुरु झाली आहे. अगदी तशीच चाचपणी आता शिवसेना ठाकरे गटात सुरु झाली आहे. ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची चाचपणी सुरु झाली आहे. मुंबईमधून या तिघांना लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधित जागांवर निवडून आणण्याचं भाजपचं ध्येय आहे. भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांकडून महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचा निश्चय करण्यात आलाय. त्यासाठी महायुतीत जोरदार हालचाली घडत आहेत. आता तशाच हालचाली ठाकरे गटात सुरु आहेत.