Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiTeam Lokshahi

मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड; सामनातून हल्लाबोल

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, मोदी हे नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असे सांगितले की, मोदी हेच ‘बॉस’ आहेत, पण त्याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे.भारत म्हणजे लोकशाहीची जननी आहे. ही जननी राजदंडात नाही. राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे.

तसेच राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे. अशा वेळी राजदंड काय करणार? मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळया गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. मोदींनी 28 तारखेस नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यात राजदंडाचे प्रतीक बसवले ते स्वतःची राजेशाही स्थापित करण्यासाठी. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

यासोबतच मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरं. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com