7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी होणार आहे. महायुतीकडून ७ नावे निश्चित झाली असून दुपारी १२ वाजता आमदारांचा शपथविधी होईल. यावर शपथविधी विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीविरोधात याचिका दाखल केली आहे.
राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच्या शपथविधी सोहळ्याला कोणतीही स्थगिती नसल्याच हायकोर्टानं सांगितलं आहे. निकाल प्रलंबित असताना 12 पैकी 7 आमदारांची नियुक्ती केल्याची हायकोर्टानं नोंद घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांच्यावतीने ऍड सिध्दार्थ मेहता यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला. चीफ जस्टिस यांनी अर्ज स्वीकारला पण सुनावणी घेण्यास नकार दिला. राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणात कोर्टाचा कोणताही स्टे नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं.