ताज्या बातम्या
Moscow: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहे. मॉस्कोच्या सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार आणि स्फोट करण्यात आला. लष्कराच्या पेहरावात दहशतवादी हॉलमध्ये शिरले अशी माहिती मिळत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडीओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येतो. क्रोकस हॉलच्या छतावरून ज्वाळा उठताना सुद्धा दिसत आहेत.
मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर 50 रुग्णवाहिका टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या. मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून 100 लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.