Terrible situation | Sri Lanka
Terrible situation | Sri Lanka team lokshahi

भीषण परिस्थिती, खाण्यापिण्यासाठी महिला करतायत वेश्याव्यवसाय

बहुतेक महिला कापड उद्योगातून पुढे आल्याचा दावा
Published by :
Shubham Tate
Published on

Terrible situation : श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांना त्यांच्या घरापर्यंत वाहने जाणे कठीण झाले आहे. अन्न आणि औषधांचाही तुटवडा झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथे वेश्याव्यवसाय झपाट्याने वाढला आहे. पोटापाण्यासाठी येथील अनेक महिलांना सेक्स वर्कर बनावे लागते. आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली येथे बिनदिक्कतपणे सेक्स वर्क सुरू आहे. (Terrible situation in Sri Lanka women forced to have sex in exchange for food and drink)

ग्राहकांसाठी पडदे आणि बेड टाकून या स्पा सेंटर्सचे तात्पुरते वेश्यालय बनवले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सेक्स इंडस्ट्रीशी संबंधित बहुतेक महिला कापड उद्योगातून येत आहेत. जानेवारीपर्यंत काम होते, मात्र त्यानंतर देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांना या व्यवसायात यावे लागले.

Terrible situation | Sri Lanka
Baby Care : बदलत्या ऋतूत अशा प्रकारे करा बाळाची काळजी, चूक पडेल महागात

एका सेक्स वर्करने वृत्तपत्राला सांगितले की, 'आम्ही ऐकले आहे की देशातील आर्थिक संकटामुळे आम्ही आमच्या नोकऱ्या गमावल्या आणि या क्षणी आम्ही पाहत असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेक्स वर्क.'

महिलेने सांगितले की, “आधीच्या कामात आमचा मासिक पगार सुमारे 28,000 रुपये होता आणि ओव्हरटाईम करून आम्ही जास्तीत जास्त 35,000 रुपये कमवू शकतो, परंतु लैंगिक कामात गुंतून आम्ही दररोज 15,000 रुपयांहून अधिक कमावतोय. प्रत्येकजण माझ्याशी सहमत असेल असे नाही, परंतु हे खरे आहे. एका वृत्तपत्राने आपल्या अहवालात दावा केला होता की, या वर्षी जानेवारीपासून कोलंबोमध्ये सेक्स वर्कमध्ये गुंतलेल्या महिलांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Terrible situation | Sri Lanka
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेची ही माहिती असणं गरजेचं

अनेक अहवाल असेही सूचित करतात की महिलांना अन्न आणि औषधांसारख्या आवश्यक वस्तूंच्या बदल्यात स्थानिक दुकानदारांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील औद्योगिक परिसरात वेश्याव्यवसायाला चालना दिली जात असल्याची माहिती आहे. या असहाय महिलांना ग्राहकांच्या विनंतीनुसार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com