एक रुपयाही न देता मिळणार तांदूळ, सरकारचा मोठा निर्णय

एक रुपयाही न देता मिळणार तांदूळ, सरकारचा मोठा निर्णय

एक रुपयाही न देता मिळणार तांदूळ, सरकारचा मोठा निर्णय
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तेलंगणाच्या के चंद्रशेखर राव (KCR) सरकारने या महिन्यापासून बीपीएल कार्डधारकांना पुढील एक वर्षासाठी 5 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) 9.1 दशलक्ष लोकांना दिला जाईल. राज्य नागरी पुरवठा आयुक्त अनिल कुमार यांनी गुरुवारी (५ जानेवारी) यासंदर्भात आदेश जारी केला आहे. विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीपीएल ग्राहकांना मोफत तांदळाचा पुरवठा केला जाणार आहे.

KCR सरकारचा हा निर्णय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयासारखाच आहे. सध्या, केंद्र सरकार 17.6 दशलक्ष NFS कार्डधारक आणि 155,500 अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांसह तेलंगणातील 1.91 कोटी BPL ग्राहकांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ पुरवठा करत आहे. केंद्राच्या ताज्या आदेशानुसार, मोफत तांदूळ पुरवठा योजना यावर्षी डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या ५ किलो तांदळाव्यतिरिक्त, तेलंगणा सरकार या लाभार्थ्यांना अतिरिक्त एक किलो तांदूळ देत आहे. आता प्रत्येक ग्राहकाला महिन्याला सहा किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की केंद्र सरकारच्या योजनांतर्गत समाविष्ट लाभार्थींबरोबरच, राज्य सरकार बीपीएल अंतर्गत ओळखल्या गेलेल्या ९.१ दशलक्षाहून अधिक ग्राहकांना रास्त भाव दुकानांमधून 1 रुपये प्रति किलो दराने सहा किलो तांदूळ पुरवठा करत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com