आजची शांतता, उद्याचं वादळ, गिरगावात लावले तेजस ठाकरेंचं पोस्टर
महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या गोष्टी घडत आहे. सध्या आता एक गोष्च चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे. सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात तेजस ठाकरेंचे पोस्टर लावले आहे.
हे पोस्टर सध्चा चर्चेचा विषय बनला आहे. 7 ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत आणि आतापर्यंत ते राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्याची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे.
आजची शांतता, उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे या आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे' अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली होती. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे.