CBI
CBI Team Lokshahi

CBI ची मोठी कारवाई; टाटा समुहाच्या पाच बड्या अधिकाऱ्यांना अटक

TATA समुहाच्या एका अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयला लाखो रुपयांचं घबाड जप्त केलं आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकांसह सहा वरिष्ठ अधिकार्‍यांना टाटा प्रोजेक्ट्सशी संबंधित लाचखोरी प्रकरणात अटक केली. पीटीआय वृत्तसंस्थेनं ही अधिकार्‍यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. टाटा प्रकल्पाचे कार्यकारी व्ही.पी. देशराज पाठक आणि सहाय्यक व्ही.पी. आर.एन. सिंग यांच्यासह पाच अधिकाऱ्यांनाही लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

CBI
सुधा मुर्तींचा जावई होणार ब्रिटनचा पंतप्रधान? बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानतंर चर्चेला उधाण

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराकडून लाच मागितली होती. झा यांच्या गुरुग्राममधील संपत्तीवर टाकलेल्या धाडीदरम्यान, सीबीआयने त्यांच्या निवासस्थानातून ९३ लाख रुपये ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCR आणि इतर भागात एकूण 11 वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला आहे. सर्व आरोपींना पंचकुला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com