Preeti Sharma Menon and raj thackeray
Preeti Sharma Menon and raj thackerayteam lokshahi

राज ठाकरेंवर कारवाई करा; औरंगाबादेतील भाषणानंतर 'आप' कडून कारवाईची मागणी

राज ठाकरेंमुळे महाराष्ट्रातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेचे पडसाद तात्काळ उमटायला सुरुवात झाली आहे. 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत नाहीतर 4 तारखेपासून मी ऐकणार नाही असं म्हणत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. यावर आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर आम आदमी पक्षाने राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, धार्मिक कार्यक्रम करण्याचा आवाहन नव्हतं तर ती धमकी होती, महाराष्ट्रातील शांतता अशा स्थितीत घेऊन जाण्याची धमकी होती ज्यामध्ये दोन्ही समूदायामध्ये काहीही करू शकतात, त्यांना चिथावणी दिली जात आहे. असे आप प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत.

Preeti Sharma Menon and raj thackeray
धर्मांधांच्या डोळ्यात अंजन; 55 वर्षांपासून हिंदू आजीबाई ठेवतात रोजे

माझी ही मागणी आहे की त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, असे कोणतेही मोठे नेते असले तरी ते शांततेवर हल्ला करणार असतील तर त्यांना अटक करणं गरजेचं आहे, असे त्या म्हणाले.

Preeti Sharma Menon and raj thackeray
राज यांच्या तीन सभा, वाचा प्रत्येक सभेत काय म्हणाले...

राज ठाकरे यांनी भोंगे हा धार्मिक मुद्दा नाही तर सामाजिक प्रश्न असल्याचे सांगितले आहे, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, जर हा धार्मिक मुद्दा नाही तर हनुमान चालिसाचा मुद्दा कुठून आला, तुम्ही तिकडे जाऊन दुसरं काहीही करू शकता, नाशिक ढोल वाजवा त्यांनी ते नाही सांगितलं, तर हनुमान चालिसा वाजवा असं सांगितलं असतं. जनता खुळी नाही, राज ठाकरे काय करतायत ते सगळ्यांना कळत आहे. अवघड स्थिती निर्माण केरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी करत असल्याचे त्या म्हणाल्या.

Preeti Sharma Menon and raj thackeray
"बाबरी पाडण्याचं सोडा, भोंगे काढायला सांगितलं तरी यांची..."; फडणवीसांची जीभ घसरली
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com