राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला! आठ महिन्यांत 30 रुग्णांचा बळी; तर 1442 जणांना लागण

राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला! आठ महिन्यांत 30 रुग्णांचा बळी; तर 1442 जणांना लागण

साथीच्या आजारांबरोबरच यंदा संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईत सर्वाधिक रूग्ण असून एकाही मृत्यूंची नोंद झालेली नाही.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

साथीच्या आजारांबरोबरच यंदा संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईत सर्वाधिक रूग्ण असून एकाही मृत्यूंची नोंद झालेली नाही. नाशिकमध्ये 13, नागपूरमध्ये 11 अशा सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेली असून राज्यात गेल्या आठ महिन्यांत आतापर्यंत 30 मृत्यूची नोंद झालेली आहे.

जून महिन्यापर्यंत रूग्णसंख्या आटोक्यात होती. जून महिन्यापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून 432 जणांना लागण झाली आहे. पावसाळ्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन ही रूग्णसंख्या तिप्पट झाली आहे. स्वाईन फ्लूसंबंधी अधिक सर्तकता महत्वाची आहे. 28 ऑगस्टपर्यंत 1442 रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रूग्ण म्हणजेच 461 रूग्ण मुंबईत आहेत. पुण्यामध्ये 260 रूग्ण तर ठाण्यात 226 तर कोल्हापूरमध्ये 103 रूग्ण असून एकही मृत्यू झालेला नाही.

नाशिकमध्ये 196 रूग्ण असून 13 मृत्यू झाले आहेत. नागपूरमध्ये रूग्ण 37 असून 11 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत असून झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, मिझोराम या राज्यांमध्ये गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेक लोक कोविड चाचणी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. स्वाईन फ्लू आणि कोविडची लक्षणे सारखीच असल्याने लोकांमध्ये याबाबत संभ्रम वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com