death
death

नागपूर हादरले! दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

मृत्यूमागे घातपाताची शक्यता; पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु
Published on

नागपूर : दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना समोर येत आहे. मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला प्रकरणाचा तपास सुरु आहे. जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे ही घटना घडली आहे.

साक्षी फुलसिंग मीना (वय 6) आणि राधिका फुलसिंग मीना (वय 3) अशी मृत बहिणींची नावे आहेत. साक्षी व राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना ही मूळची राजस्थान येथील रहिवासी असून नागपूरमधील पाटणसावंगी तिचे माहेर आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे तीनपैकी दोन लहान मुलींची प्रकृती अचानक खराब झाल्याने आई माधुरीने दोघींनाही मंगळवारी सकाळी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु, डॉक्टरांनी एकीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर दुसरीवर प्रथमोपचार करून नागपूरला मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. पण, तिचाही वाटेत मृत्यू झाला. या दोन्ही चिमुकल्या सख्या बहिणींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com