''मै बडा की तू' हे दाखवण्यासाठी शिंदे आणि फडणवीस...' उल्हासनगरमधील घटनेवर सुषमा अंधारे म्हणाल्या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधला स्वश्रेष्ठत्वतेचा वाद शिंगेला पोहचला आहे. 'मै बडा की तू बडा' हे दाखवण्यासाठी ही रस्सीखेच सुरू असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.
उल्हासनगरमधील घटनेवर सुषमा अंधारे म्हणाल्या की, गोळीबार ही धुसफूस नसून हा गॅंगवॉर आहे. शिंदे फडणवीस यांच्यातला हा गँगवॉर आणि गॅंगवॉरमध्ये आपले गुंड पाळायचे असतात तसे हे पाळले आहेत. हे लोकप्रतिनिधी नाही आहेत. हे गुंड पाळले असल्याचं देखील अंधारे यांनी बोलताना सांगितले.
जळगाव मधील किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करतात, आमदार संतोष बांगर हे अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि स्वतः मारहाण केल्याचं सांगतात. दुसरीकडे आ.गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात, आ. संजय गायकवाड गलिच्छ भाषा वापरतात. नेमकं हे चालतरी काय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला भाजप आमदार सुनील कांबळे मारहाण करतात तर गणपत गायकवाड गोळीबार करून त्याच समर्थन करतात जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता तर हे घटल नसतं. लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून काम न करू देता त्यांना गुंड म्हणून पाळण्याचा प्रघात इथे बघायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गॅंगवॉर मध्ये महाराष्ट्राचं मर्यादिशील राजकारण इथली शालीनता आणि कायदा सुव्यवस्थेला हरताळ फासण्याचे काम विद्यमान सरकारने केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री म्हणून स्पेशल नापास ठरले आहेत.