'आता आपण वसुली भाई राहिलेलो नाही...' उद्धव ठाकरेंवरील टीकेवरुन सुषमा अंधारेंचा नरेश म्हस्केंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांचा नुकताच दिल्ली दौरा पार पडला. ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या दिल्ली दौऱ्यावर ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी 'मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही' अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंवर केली, तसचं गंभीर आरोपही केले. यावरच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नरेश मस्के यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नरेश मस्के म्हणाले होते की, ''उद्धव ठाकरे यांचा हा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता'', अशी टीका नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काही लोकांवर मी प्रतिक्रिया देणं मी टाळते. त्यापैकी एक नरेश मस्के एक आहे. मस्के हे खासदार झाले पण त्यांची बौद्धिक अपैत आहे ती अजूनही चिंधी चोरा सारखी आहे ती काय वाढत नाहीये अशी टीका त्यांनी केली,नरेश मस्के आपण आता वसुली भाई राहिलेलो नाही, आता आपण खासदार झालोय, त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. नरेश मस्के ज्यांच्या जीवावर उड्या मारतात ते एकनाथ शिंदेना सुद्धा स्पष्टीकरण द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता बांधील नाही.
यावेळी त्यांनी नवनीत राणांच्या मेळघाट दौऱ्यावर सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी त्यावेळी आपल्या कामाचा वेळ मातोश्रीवर निष्काळंन तिष्ठत बसण्यामध्ये जो घालवला होता तो वेळ जर इथे घालवला असता तर पराभव झाला नसता.