Sushma Andhare Press Conference
Sushma AndhareLokshahi

सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या; "फेक नरेटिव्हचा धडधडीत पुरावा..."

पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Sushma Andhare On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचं भाजप अधिवेशनातील भाषण ऐकलं तर, फेक नरेटिव्हचं सर्वात मोठं केंद्र देवेंद्र फडणवीस आहेत, असं वाटतं. फेक नरेटिव्हचं केंद्र किती मोठं असू शकतं, याचा फार मोठा धडधडीत पुरावा देवेंद्र फडणवीसांचं भाषण आहे. फडणवीस म्हणाले, ठाकरेंना महाराष्ट्रात आरक्षण टीकवता आलं नाही, तर बिहारमध्ये भाजपचं डबल इंजिन सरकार होतं. मग बिहारमध्ये आरक्षण टीकवता का आलं नाही? महाराष्ट्रात आरक्षण द्यायची तुमची नियत नाही. मग तुम्ही अशाप्रकारे गोंधळाची स्थिती का निर्माण करत आहात? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या,बाबासाहेबांनी राज्यघटनेत आरक्षणाची कालमर्यादा १० वर्षांची ठेवली होती. पण फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे. देवेंद्र फडणवीस फार हुशार आहेत. ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल, अशी माझी समजूत होती. पण काल ते खूप खोटं बोलत होते. फडणवीस साहेब तुम्हाला गरज असेल, तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आणून देते. भारतीय राज्य घटनेत आरक्षणाचे तीन प्रकार पडले आहेत. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे. राजकीय आरक्षण दहा वर्षांसाठी ठेवले होते.

सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नव्हती. राजकीय आरक्षण जर दहा वर्षांसाठी असेल, तर १९५० ला घटना अंमलात आली. म्हणजेच १० वर्षांनी १९६० ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती, त्यावेळी भाजपचा बालोत्यात (लहान बाळांचं छोटं कापड) होती. फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे फडणवीस आहेत. पहिल्यांदा स्वत:च्या अंत:मनात डोकावून बघा. राजकीय आणि सामाजिक आरक्षणला कुणीही धक्का लावू शकत नाही. हे घटनेत सांगितलेलं आहे. त्यांनी याचा थोडा अभ्यास करावा.

आरक्षणासंदर्भात बोलत असताना त्यांनी राहुल गांधीवरही टीका केली. भाजप कायम हिंसा करते आणि इथला हिंदू अजिबात हिंसक नाही, असं राहुल गांधी यांनी संसदेत म्हटलं होतं. भाजप आणि आरएसएस स्वत:ला सकल हिंदू समजतात. भाजप आणि आरएसएस सकल हिंदू नाहीत. हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. तरीही फडणवीस पुन्हा फेक नरेटिव्ह तयार करत आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com