'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' 
 सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अंबाजोगाई मधील रद्द झालेल्या सभेवरून राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील असा टोला त्यांनी लगावला आहे.
Published by :
shweta walge
Published on

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेचे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची अंबाजोगाई मधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतीलअसा टोला लगावला आहे. तसेच जे लोक बिन शर्त पाठिंबा देतात आणि एक जागा निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा राजकारण करतात, अशावर फार बोलण्याची गरज नाही, असा खोचक टोलाही सुषमा अंधारेंनी लगावला. त्या सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचार सभे निमित्त बोलत होत्या.

'बटेंगे तो कटेंगे' विधानावरील घुमजावं नंतर सुषमा अंधारे यांचा पंकजा मुंडेंना टोला

पंकजा मुंडे या बारा वर्षे वनवासात होत्या,आता कुठे त्या स्थिर झाल्यात ,त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध कराव्या लागतात,असे शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडेंच्या बटेंगे तो कटेंगे,या विधानावरून केलेल्या घुमजावावरून टोला लगावला आहे,तसेच त्यांच्याच महायुतीतील पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी देखील याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे,असे मत ही अंधारे यांनी व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com