सरसंघचालकजी, आधी फडणवीस यांचे कान उपटा; सुषमा अंधारे यांची जहरी टीका
आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडत आहे. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दणक्यात भाषण केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह आरएसएसवरही जोरदार टीका केली आहे.
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवस संघाकडून नागपुरात दसरा मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, द्वेष संपला पाहिजे. सांप्रदायिक विभाजन होता कामा नये. दुर्बल घटकांना सोबत घेऊन देश मजबूत झाला पाहिजे. सरसंघसंचालकजी तुमचं म्हणणं सर आँखोपर. पण तुम्ही हे सांगताय कुणाला? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सरसंघ संचालक मोहादय जर खरच द्वेशबुध्दी संपवायचा सल्ला द्यायचा असेल तर हा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्या. ज्यांनी या राज्यामध्ये माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही, ज्यांनी द्वेशाच राजकारण पसरवलं आणि ते द्वेशाच राजकारण पसरवण्यासाठी कोकणमध्ये न चालणारी चिल्लंर जी बाजारातून रद्द झाली आहे. असे चाराणे बाराणे इथे बाजारात आणतायं, आणि तुमची न खपलेली चिल्लर इथे लोकांमध्ये जर द्वेश पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना की आम्हाला हा महाराष्ट्रा शांत हवा आहे. इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करु नका, अशी टीका अंधारे यांनी केली आहे.
पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं जातयं, आधी ही चाराणे बाराणे हिंदू मुस्लिम करत होती. हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्या कडून होतंय. जनतेमध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी. हे का असं करतात कारण यांनी माहिती आहेत की, उद्या निवडणुका लागल्या आणि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणारतील की, बेरोजगारीच काय केलं, नोकरभरतीच काय केलं. सत्तेत आल्यापासून MPSCच्या सत्तर प्रकारच्या परीक्षा झाल्या, त्यातल्या 65 परीक्षांची पेपरफुटी झाली. यावर लोक प्रश्न विचारतील, आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील, तलाठी भरती, होम गार्ड प्रश्न विचारतील. या सर्व प्रश्नाची उत्तर यालोकांकडे नाहीत. म्हणून ही लोक राजकारण करतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायच सोडून ते जातीपातीच भांडण लावण्याच प्रयत्न करतात. आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाहीत. शिंदे साहेब राजकारण कोणी केलं ते जरा निट समजून घ्या. जिवंत माणसांच तर सोडा तुम्ही तर महापुरुषांच देखील राजकारण केलं. शिंदे साहेब एकही आंदोलन हाताळता आलं नाही. आम्हाला आनंद आहे की सन्माननीय पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होता तेवढा काळ या राज्यात एकही साप्रदायिक आणि धार्मिक दंगल झाली नाही. पण शिंदे साहेब तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या अशी जहरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.