Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' पुरस्कार प्रदान केला. सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला आहेत.राष्ट्रपती मुर्मू रविवारी सुरीनामला पोहोचल्या. राजधानी पारमारिबो येथील जोहान अॅडॉल्फ पेंगेल विमानतळावर राष्ट्रपती चंद्रिका संतोखी यांनी त्यांचे पूर्ण राज्य सन्मानाने स्वागत केले.

मला खूप सन्मान वाटत आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतातील 140 कोटी लोकांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com