Sheetal Mhatre Tweeted Fake Photo of Supriya Sule
Sheetal Mhatre Tweeted Fake Photo of Supriya SuleTeam Lokshahi

सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट, राष्ट्रवादी आक्रमक; शितल म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला. त्यानंतर विरोधकांकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला. त्यानंतर विरोधकांकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीटरवर सुप्रिया सुळे यांचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. तर, शेजारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बसलेले दिसत आहेत.

मात्र आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी देखील खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फोटो ट्विट करत ‘हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ? असा सवाल त्यांनी केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले असून, हा फोटो बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात शीतल म्हात्रेंविरोधात वरळी पोलिसांत राष्ट्रवादीच्या आदिती नलावडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तसेच सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तसे दोन वेगवेगळे फोटोही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेत. फोटोत छेडछाड करुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळे बसल्याचं भासवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलाय. गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत याबाबतचा दावा केलाय.

Sheetal Mhatre Tweeted Fake Photo of Supriya Sule
शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी ट्वीट केलेला सुप्रिया सुळेंचा 'तो' फोटो एडिटेड
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com