'तुमची सत्ता आहे.. तुमचं नाव त्या पदावर...' बारामतीच्या सभेत सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या
आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बारामतीमध्ये शरद पवारांची सांगता सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सगळं त्यांनीच केलं अशी ते भाषणं करतात ना.. म्हणजे MIDC त्यांनीच काढलं, विद्या प्रतिष्ठान त्यांनीच काढलं. साहेबांनी तर काहीच केलं नाही ना.. कारण त्या मलिदा गँगने एवढं गुरफटलंय ना त्यांनी..." अस म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
बारामतीच्या टेक्सटाइल पार्कमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार आणि नात रेवती सुळे यांना प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर बोलताना त्या म्हणाल्या, "तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे.. तुमचं नाव त्या पदावर..अधिकार आहे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवायची.
"बाकी आम्ही काही केलं असेल.. पण बारामतीत ईडी नाही आम्ही आणली. त्या मलिदा गँगला मला एक प्रश्न विचारायचा आहे. ते टेक्सस्टाइल पार्क पवार साहेबांनी मंत्री असताना बारामतीत आणलं. 6 हजार लोकं कामाला असायची तिथे. 50 टक्के तिथल्या फॅक्टरी आज बंद आहेत. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला शब्द देते की, मी स्वत: त्या टेक्सटाइल पार्कमध्ये लक्ष घालीन आणि 100 टक्के क्षमतेने ते टेक्सटाइल पार्क तुम्हाला सुरू करून देईन.
माझ्यावर त्या पत्रात टीका झाली. की, सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आलेल्यांना 1500 रुपयांची काय किंमत? अरे हो.. सोन्याचा चमचा घेऊन आलीए जन्माला आलीए, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी या ज्या 6 सोन्याच्या बांगड्या घालतेय ना.. या बांगड्या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत होती तोपर्यंत त्यांच्या हातात या बांगड्या होत्या. माझी आजी गेली तेव्हा त्या आईला दिल्या. आई घालत नाही सोन्याचं म्हणून त्या कपाटात ठेवायची. माझ्या लग्नात त्या मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस.. माझी ताकद कुठून येत तर शारदाबाईच्या या सहा बांगड्यांमधून येते.