बारामतीमध्ये अजित पवारांचं काय होणार? सुप्रिया सुळे थेट म्हणाल्या...
बारामतीमध्ये अजित पवारांचं काय होणार या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर यांचा अर्ज भरण्यासाठी सुप्रिया सुळे या अकलूज मध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी वक्तव्य केलं. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे. अगोदर दोन पक्ष लढत होते आता तीन-तीन पक्ष लढत आहेत. हे सगळे उद्योग अदृश्य शक्तीने केले आहेत असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
त्या म्हणाल्या की, ही लढाई त्याच अदृश्य शक्तीच्या विरुद्ध आहे ज्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गोंधळ करून ठेवला आहे. माळशिरसमधून उत्तम जानकर हे विक्रमी मताने निवडून येतील. 4 नोव्हेंबर नंतर राज्यातील चित्र स्पष्ट होईल. भाजपला माळशिरस मध्ये उमेदवार मिळत नाही. यावर दुसरे के घर मे मै क्यू झाकू असे उत्तर त्यांनी दिलं.
तसच उत्तम जानक यांनीही माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाल्या की, राज्याच्या राजकारणामध्ये येणे इतकी अजित पवारांची कुवत नव्हती उंची नव्हती. फक्त शरद पवारांचा हात डोक्यावर असल्याने ते मोठे झाले होते. आता शरद पवारांनी हात काढल्याने बारामती मध्ये अजित पवारांचा पराभव होणार आहे. अजित पवारांचा काळ आता संपला आहे निवडणुकीनंतर ते आपल्या व्यवसायामध्ये लक्ष घालतील असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यावर राग काढला. या मतदारसंघाचे आमदार असून गेली सहा महिने झाले ते इकडे फिरकले नाहीत. त्यांच्याबद्दल माळशिरस च्या मतदारांमध्ये प्रचंड राग आहे. 20 नोव्हेंबर पर्यंत आमदार राम सातपुते माळशिरस मध्ये दिसतील त्यानंतर ते पुण्याला जातील. या मतदारसंघातून दीड लाख मतांनी विजय माझाच होणार आहे असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर यांनी व्यक्त केलाय.