सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन

मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंह मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा येत्या ३० जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला दरवर्षी राज्यात सामाजिक कार्यक्रमासह वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. मुंबईत सुद्धा राष्ट्रवादीच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश सेलचे सचिव प्रतिक बबन नांदगांवकर यांनी ताई चषक २०२२ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन
IPL Media Rights: आयपीएलच्या एका सामन्याची किंमत 100 कोटी, सोनीने घेतले हक्क?

मुंबईतल्या तळागाळतल्या तरुणांना खेळाप्रती असणारी आवड ही आजवर अनेक खेळाडुंच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. अशाच तरुणांना संधी देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही आयोजित केली असून, यामुळे अनेक तरुणांना संधी आणि व्यासपीठ मिळणार असल्याचं प्रतिक नांदगांवकर यांनी लोकशाहीशी बोलताना सांगितलं. येत्या ३० जून रोजी सुरु होणाऱ्या ताई चषक या कार्यक्रमाची अंतिम सामना १ जुलै रोजी होणार आहे. मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील शहिद भगतसिंह मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांचे नीकटवर्तीय मानले जाणाऱ्या प्रतिक नांदगांवकर यांनी आजवर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असून, कोरोना काळात देखील त्यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले होते.

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन
Virat Kohli : विराट कोहली 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com