Supriya Sule
Supriya SuleLokshahi Marathi

Supriya Sule: सुप्रिया सुळे ठरल्या नंबर वन खासदार!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले आहे. संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके. यातून सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने व नेमकेपणामुळे पुन्हा एकदा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देशाच्या संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करून दाखवला आहे.

संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या.

विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या सत्रातील त्यांची उपस्थिती १०० टक्के भरली आहे. मागील पंचवार्षिक काळात १६व्या लोकसभेतही सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले होते. मागील लोकसभेतही त्यांनी ११८१ प्रश्न उपस्थित केलेले होते आणि एकूण २२ खाजगी विधेयके मांडलेली होती. तसेच १५२ वेळा चर्चेत सहभागी झाल्या होत्या. मागील संसदेतही त्यांची उपस्थिती १०० टक्के इतकीच होती.

Supriya Sule
'पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात...' राज ठाकरेंची नाव न घेता उध्दव ठाकरेंवर टीका

विद्यमान १७ व्या लोकसभेचा अहवालात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले व त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी केली. खासदार सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com