ताज्या बातम्या
सुप्रीम कोर्टात BCCI च्या याचिकेवर आज होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात आज आज बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज आज बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोर्टाने बीसीसीआयची याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढणार आहे. बीसीसीआयने आपल्या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये, आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी 'कूलिंग-ऑफ' कालावधी संपवण्याबाबत नमूद केले आहे, ज्यामुळे सौरव गांगुली आणि जय शहा यांना संबंधित राज्य क्रिकेट संघटनांमध्ये सहा वर्षे पूर्ण होऊनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून काम चालू ठेवता येईल.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहुल गांगुलीचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत, तर शाह बीसीसीआयपूर्वी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होते. या याचिकेत बीसीसीआयने आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे.