द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी; नूह घटनेवर SC चे निर्देश

द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी; नूह घटनेवर SC चे निर्देश

नूहमध्ये पसरलेल्या हिंसाचारामुळे हरियाणात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.
Published on

नवी दिल्ली : नूहमध्ये पसरलेल्या हिंसाचारामुळे हरियाणात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून यावर सुनावणी झाली. हिंसाचार किंवा द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी करण्यात येणार आहे.

द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी; नूह घटनेवर SC चे निर्देश
लोकांना जीवे मारण्याचे हिंदुत्व भाजपा व फडणवीसांना मान्य आहे का? पटोलेंचा सवाल

नूह प्रकरणी मुख्य न्यायाधीशांसमोर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सुनावणी करतना न्यायालयाने म्हंटले की, द्वेषयुक्त भाषणांमुळे वातावरण बिघडते आहे. कायद्याचे राज्य राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. आज चार वाजता महापंचायत होत आहे. तरीही रॅलींना बंदी घालण्यात आलेली नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे, असे सांगितले आहे.

तसेच, सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात. संवेदनशील भागात अतिरिक्त खबरदारी घ्यावी, तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफी करण्यात यावी, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील किमान पाच भागात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. नाखडोला गावाजवळील एका झोपडपट्टीवर तरुणांच्या टोळक्याने हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com