अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर; संजय राऊत म्हणाले...

अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर; संजय राऊत म्हणाले...

अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. मात्र जामिनाबाबत 3 सदस्यांचं खंडपीठ अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाचा निर्णयाचे स्वागत करतो. अरविंद केजरीवाल यांना खालच्या कोर्टाने जामिन दिला होता. त्याला स्थगिती देण्याचे काहीही कारण नव्हते.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पण मोदी शाहांचा राजकीय दबाव ईडीवर आणि न्यायालयावर असल्यामुळे त्यांना स्थगिती मिळाली. सुप्रिम कोर्टाने चूक दुरुस्त केली. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com