Sunil Tatkare vs Amol Kolhe
Sunil Tatkare vs Amol Kolhe

'ओरिजनल राष्ट्रवादी' म्हणत सुनील तटकरेंनी लोकसभा अक्ष्यक्षांना दिल्या शुभेच्छा; अमोल कोल्हे म्हणाले," २० टक्के स्ट्राईक रेट..."

लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना खासदार सुनील तटकरे यांनी ओरिजनल राष्ट्रवादी असा उल्लेख केला. तटकरेंच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Sunil Tatkare vs Amol Kolhe : लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना खासदार सुनील तटकरे यांनी ओरिजनल राष्ट्रवादी असा उल्लेख केला. प्रचारातील असली नकलीचा मुद्दा लोकशाहीच्या मंदिरात गेला आहे. तटकरेंच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी तीव्र विरोध केला आहे.

काय म्हणाले खासदार अमोल कोल्हे?

प्रचाराचा मुद्दा थेट लोकसभेत पोहोचला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना ओरिजनल राष्ट्रवादी असा उल्लेख तटकरेंनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, मला वाटतं जनता जनार्दनाने कौल दिलेला आहे. एका पक्षाने पाच जागा लढवल्या आणि त्यापैकी एक जागा निवडून आली. म्हणजे २० टक्के स्ट्राईक रेट आहे. दुसरीकडे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही १० जागा लढवल्या आणि त्यातल्या ८ जागा निवडून आल्या.

म्हणचे आमचा स्ट्राईक रेट ८० टक्के आहे. आपल्याकडे २० टक्के मिळालेल्या पास सुद्धा म्हणत नाही. ज्याला ८० टक्के मिळाले आहेत, त्याला मेरीटमध्ये आला असं म्हणतात. हे जनतेनं ठरवलेलं आहे. एकीकडे ८० टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे. तर दुसरीकडे २० टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे. जनता जनार्दनाने त्यांचा निकाल दिलेला आहे. कुणाला काही म्हणायचं असेल, तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com