ताज्या बातम्या
Sunil Tatkare : बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास सुनेत्रा पवार उमेदवार असतील
बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा होती.
बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा होती. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असतील असे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.
तसेच ते म्हणाले की, गेल्या ४० वर्षांत अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात त्याचे परिणाम दिसतील, असेही तटकरे यांनी सांगितले.