'पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात' सुनेत्रा पवार यांचं मोठं वक्तव्य

'पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात' सुनेत्रा पवार यांचं मोठं वक्तव्य

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना मूळ पवार कोण याबद्दल दावे प्रतिदावे आणि वैयत्तीक टीका टिपण्णी होत आहे.
Published by :
shweta walge
Published on

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना मूळ पवार कोण याबद्दल दावे प्रतिदावे आणि वैयत्तीक टीका टिपण्णी होत आहे. पणं या निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात असं मोठ वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

मी मतदारसंघात फिरतेय, मला खात्री आहे चांगल्या लीडने मी विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसचं गेल्या 25 वर्षांपासून मी समाजकार्यात आहे. भोरमधील एमआयडीसी आणि पुरंदरमधील विमानतळाचा विषय मी मार्गी लावणार असं त्या म्हणाल्या.

अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे, मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.मतदारांची भाषा मला नक्की समजते, त्यामुळे मतदारांचे प्रश्न मी संसदेत नक्कीच मांडणार. मी एकटी नाही, बारामती माझं कुटूंब आहे, बारामतीकर माझं कुटूंब असणार आहे, त्यामुळे मी कुठेही एकटी नाहीय. निवडणुका या तेवढ्या पुरत्या असतात, मात्र निवडणूका संपल्यावर संबध सुधारू शकतात असं त्या म्हणाल्या

दरम्यान, बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या 18 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नणंद - भावजय विरुद्ध जरी ही लढाई असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com