'स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरीबाला...' असं का म्हणाले सुजय विखे पाटील

'स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरीबाला...' असं का म्हणाले सुजय विखे पाटील

खासदार विखेंचा शेरोशायरीतून विरोधकांना टोला
Published by :
shweta walge
Published on

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल नवीन संसद भवनात आपल्या निवेदनात चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्यांनी 'वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो गए आसमान से, रखकर चांद पर कदम आज हमने इतिहास बना दिया, जिनको शक था हमारी काबिलियत पर, आज उन सबको गवाह बना दिया अशी शेरोशायरी करत निवेदन केले.

चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, या मोहिमेत १०० महिला वैज्ञानिक होत्या. चांद्रयान ३ मोहिमेकडे नारीशक्तीचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाईल असं ते म्हणाले.

विरोधकांवर टीका करत सुजय विखे पाटील म्हणाले, लहानपणी आम्ही नेहमी ऐकलेली कविता चंदामामा दूर के पुए पकाए पुरके, आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली मे या हिंदी कवितेचा दाखला देत ते म्हणाले, अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत तसेच आहे. स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरीबाला साधे पाणी पण दिले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या घरा पर्यंत पाणी पोहचविले.

'स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरीबाला...' असं का म्हणाले सुजय विखे पाटील
शेतकऱ्यावर संकट; कृषी विभाग मात्र बैठकीत

चांद्रयान २ अयशस्वी झाल्यावर इस्रोचे संचालक हे खूप नाराज झाले होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी त्यांना त्यावेळी नुसता धीर दिला नाही तर त्यांना पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान ३ मोहीम करण्यास भाग पाडले. मोहीम जगात सर्वात यशस्वी करणारा आपला भारत देश हा पहिला ठरला. या यशस्वी मोहीमबद्दल त्यांनी शेरोशायरी सादर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com