धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

गुजरातच्या सूरतमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

गुजरातच्या सूरतमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळं देशात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रीता सोलंकी, वडील कानू सोलंकी, आई शोभा सोलंकी आणि दिशा, काव्या आणि कुशल नामक तीन मुलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सूरतच्या पालनपूर येथे ही घटना घडली. पालनपूर पाटिया येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. शांतिलाल सोलंकी यांनी पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना विष दिलं. त्यानंतर शांतिलाल यांनी घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळाली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com