काँग्रेसबाबत केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ?

काँग्रेसबाबत केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge
Published on

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला टॅग करत मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पोस्टवर निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेतली आहे.

सावंत यांचं ट्विट

निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. @ECISVEEP ने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे.

@CEO_Maharashtra या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल.

सचिन सावंत यांच्या या पोस्टवर निवडणूकआयोगच उत्तर

सावंत यांच्या या पोस्टवर उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे सांगितले आहे. "आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com