विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला : सुधीर मुनगंटीवार

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला : सुधीर मुनगंटीवार

मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले.
Published by :
Sagar Pradhan
Published on

अनिल ठाकरे। चंद्रपूर: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. सर्वच स्थरावरून अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यावर आता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार शोकभावना व्यक्त केली आहे.

आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले.

भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com