tiger hunting in Wardhya
tiger hunting in Wardhyateam lokshahi

वर्ध्यात पट्टेदार वाघाची शिकार; आढळले 14 तुकडे

वाघाची शिकार 6 ते 7 दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाज
Published by :
Shubham Tate
Published on

वर्धा (भूपेश बारंगे) : आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वनक्षेत्र कोरा शिवारातील पवनगाव झुडपी जंगल परिसरात नाल्यात पट्टेदार वाघाच्या 14 तुकडे आढळले, यात वाघाचे नखे, मिश्या, दात यासह काही अवयव गायब असल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. (Striped tiger hunting in Wardhya; Found 14 pieces)

११ ऑगस्टला गुरुवार सायंकाळी पवनगाव परिसरात गुराखी जनावरे चारत असताना दुर्गंधी येत असल्याने गुराखी यांनी पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरील भाग दिसून आले. काही अवयव आजूबाजूने आढळून आल्याने गुराखी यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काल सायंकाळी घटना उघडकीस आल्याने या घटनेचे तपास आज करण्यात आली.

tiger hunting in Wardhya
जो घाबरेल त्याला घाबरवलं, जो विकला त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांचा शिंदे गटाला इशारा

वनविभागाचे पथक आज सकाळपासून घटनेची सखोल चौकशी पाहणी केली असता परिसरात आजूबाजूने वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे 14 तुकडे आढळून आले. यात वाघ नर की मादी हे कळू शकते नाही. सर्वच अवयव जमा करुन पाहणी केली असता पायाची नखे, तोंडाची मिशाचा भाग जबड्यासहित कापलेला असून खालील जबड्याचे 4 दात आढळून आले असून इतर दात गायब आहे. यावरून वाघाची शिकार झाल्याची शक्यता आली. या वाघाची शिकार 6 ते 7 दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

वनविभागात वाघाच्या शिकार करणाऱ्या आरोपीच्या शोधकार्य सुरू केले आहे. या घटनेत सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. वाघाचे 14 तुकडे मिळून आलेल्या अवयव गोळा करुन त्याचे नमुने घेण्यात आले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या घटनेत वनविभाग कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघाची शिकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघाच्या अवयवाचे शवविच्छेदन केल्यानंतर अग्नी देऊन दहन करण्यात आले. याबाबत वाघाची शिकार केल्याचे अंदाज Lokशाही ने वृत्त प्रकाशित व्यक्त केले होते.

tiger hunting in Wardhya
नवनीत राणा पोलीस आयुक्तांवर संतापल्या

हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून आज वनविभागाने सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. वाघाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी डॉ.मेघा बनकर, डॉ.सुशील पांडव, डॉ.सचिन खेमलापुरे यांनी केले. यावेळी मुख्य वनरक्षक रंगनाथ नाइकडे, डॉ.भारतसिंग हाडा, उपवनसंरक्षक नागपूर दक्षता विभागीय वनअधिकारी पी.जी.कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही.बोरकर, ए. एस. निनावे, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस.ताल्हन, कौस्तुभ गावंडे, मानव वन्यजीव रक्षक संजय इंगळे यांची उपस्थिती होती.

वाघाच्या शिकार प्रकरणातील आरोपींच्या शोधात वनविभाग

पवनगाव शिवारात वाघाच्या शिकार केल्याप्रकरणी वनविभागात अज्ञातच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वाघाची हत्या करून अवयवाची शिकार करण्यात आली आहे. वनविभागात आरोपीचे शोधकार्य सुरू केले असून आरोपीना कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमी कडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com